यूजर-फ्रेंडली डिझाइन आणि ॲपशी संबंधित कॉन्टेन्ट स्ट्रीम असलेले इंडस ॲपस्टोअर हे भारतीय ग्राहकांसाठी तयार केलेले स्थानिक ॲपस्टोअर आहे; ज्यामध्ये विविध ॲप शोधणे आणि ॲपस्टोअर वापरणे सोपे केले आहे. इंडस ॲपस्टोअर हे पूर्णपणे सुरक्षित आणि सिक्युअर स्टोअर आहे कारण प्रत्येक ॲप युजरसाठी उपलब्ध करण्यापूर्वी स्कॅन आणि रिव्ह्यू केले जाते.

सध्या, इंडस ॲपस्टोअर मर्यादित डिव्हाइसवर उपलब्ध आहे. तथापि, आम्ही याचा विस्तार करण्यावर काम करत आहोत. इंडस ॲपस्टोअरला सपोर्ट करणाऱ्या डिव्हाइसबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया आम्हाला [email protected] वर ई-मेल करा आणि आम्ही तुम्हाला माहितीसह मदत करु.

नाही, इंडस ॲपस्टोअर वापरण्यासाठी फोनपे वर नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक नाही. तुम्ही लॉग इन पेजवर कोणताही एक मोबाईल नंबर एंटर करु शकता आणि OTP ने व्हेरिफाय करु शकता. नोंद घ्या की: कोणतेही कॅशबॅक/रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी यूजरने फोनपे ॲप इंस्टॉल करणे आवश्यक आहे.

होय, हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ॲप डाउनलोडसाठी ॲक्सेसिबल बनवण्याआधी, इंडस ॲपस्टोअरवरील प्रत्येक ॲपची काळजीपूर्वक तपासणी केली जाते आणि कोणताही दुर्भावनापूर्ण कॉन्टेन्ट किंवा माहिती आहे का हे तपासले जाते.

कृपया तुम्ही ॲपचे नाव अचूकपणे टाइप केले आहे याची खात्री करा किंवा तुमचे सर्च कीवर्ड्स योग्यरित्या टाइप करा. याव्यतिरिक्त, डेव्हलपरने ते ॲप अद्याप आमच्या स्टोअरवर अपलोड केले नसल्याची शक्यता असू शकते. असे असल्यास, आम्ही ते ॲप शक्य तितक्या लवकर ऑनबोर्ड करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत, आम्हाला ॲपबद्दल माहिती देण्यासाठी तुम्ही आमच्याशी [email protected] वर संपर्क साधू शकता, जेणेकरुन आम्ही ऑनबोर्डिंग प्रक्रिया जलद करु शकू. ॲप उपलब्ध होताच आणि इंस्टॉलेशनसाठी तयार होताच आम्ही तुम्हाला सूचित करु.

तुमचे ॲप पब्लिश करण्यासाठी, तुम्हाला इंडस ॲपस्टोअर डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. "लिस्ट माय ॲप" वर क्लिक करा, खाली नमूद केलेले तपशील भरा आणि ॲप रिव्ह्यूसाठी सबमिट करा: • ॲप डिटेल्स. • ॲप मेटाडेटा. • इंडियन लँग्वेज लिस्टिंग. • डेव्हलपर इन्फो अँड डेटा सेफ्टी. • अपलोड ॲप्लिकेशन. तुमचे ॲप लिस्ट करण्याच्या स्टेप्स जाणून घेण्यासाठी "येथे" क्लिक करा.

हे खालीलपैकी एका कारणामुळे असू शकते, • इंटरनेट कनेक्शनमधील अडचणी • कमी डिव्हाइस स्टोअरेज. • तुमच्या डिव्हाइसचे OS वर्जन ॲपला सपोर्ट करत नसावे. • ॲप तुमच्या डिव्हाइससाठी कम्पॅटिबल नाही. कृपया वरील गोष्टी तपासा आणि ॲप पुन्हा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास, कृपया [email protected] वर आमच्याशी संपर्क साधा.

फीडबॅक किंवा रिव्ह्यू देण्यासाठी, तुम्ही इंडस ॲपस्टोअर वरील ॲप रिव्ह्यू फिचर वापरू शकता. आवश्यक वाटल्यास तुम्ही रिव्ह्यू अयोग्य म्हणून देखील चिन्हांकित करू शकता. ॲपस्टोअर-संबंधित समस्यांसाठी, कृपया आम्हाला [email protected] यावर फीडबॅकसह ईमेल करा.

सध्या ॲपस्टोअर फक्त इंग्लिश आणि 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. भविष्यात आणखी काही भाषा जोडल्या गेल्यास, त्या भाषा यादीमध्ये दिसतील. सध्या उपलब्ध असलेल्या भाषा खालीलप्रमाणे आहेत: - हिंदी - मराठी - गुजराती - तेलुगू - तमिळ - पंजाबी - मल्याळम - ओडिया - कन्नड - बंगाली - आसामी - उर्दू.

जेव्हा यूजरला असे वाटते की त्यांच्या समस्येचे L1 आणि L2 स्तरांवर निराकरण झालेले नाही आणि 10 दिवस किंवा त्याहून अधिक काळासाठी त्यांच्या समस्येचे निराकरण केले गेले नाही, तेव्हा ते तक्रार नोंद करु शकतात.

तुम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास, [email protected] यावर आमच्याशी संपर्क साधा.