वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय! इंडस ॲपस्टोअर डाउनलोड करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. फोनपे समूहातील एक भारतात तयार केलेले ॲप म्हणून आम्ही ओळखले जातो, तसेच ॲपस्टोअरच्या मार्केटमध्ये आम्हाला एका दशकाहून अधिक अनुभव आहे.

तुम्ही तुमच्या मोबाईल ब्राउझरमध्ये (indusappstore.com) या वेबसाइटवरील डाउनलोड बटणावर क्लिक करुन इंडस ॲपस्टोअर डाउनलोड करु शकता. एक APK फाईल तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये डाउनलोड केली जाईल, ती उघडा आणि इंस्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे अनुसरण करा. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरमध्ये (indusappstore.com) या वेबसाइटला भेट देऊन QR (क्यूआर) कोड स्कॅन करु शकता किंवा डाउनलोड लिंक मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर एंटर करु शकता.

इंडस ॲपस्टोअर हे अँड्रॉइड OS 8 आणि त्यानंतरच्या सर्व अँड्रॉइड डिव्हाइसेसमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

तुम्ही तुमच्या मोबाईलवर इंडस ॲपस्टोअर इंस्टॉल केल्यानंतर, त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा, इंडस ॲपस्टोअरला ॲप्स इंस्टॉल करण्याची परवानगी द्या आणि तुम्ही तुमचे सर्व आवडते ॲप्स ब्राउझ करणे आणि डाउनलोड करणे सुरु करु शकता.

इंडस ॲपस्टोअरवरील प्रत्येक ॲपची आमच्या अँटीव्हायरस आणि सायबरसुरक्षा तज्ञांकडून 7-स्टेप्सची सुरक्षा तपासणी केली जाते.