Indus | Privacy policy banner

Privacy Policy

गोपनीयता धोरण

ऑगस्ट 2025 रोजी अपडेट केले

ही धोरणे Indus Appstore प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव ‘ओएस लॅब्स टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड), जी कंपनी कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत नोंदणीकृत असून, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता #51/117, नेल्सन टॉवर्स, नेल्सन मणिकम रोड, अमिनजिकाराई, चेन्नई, तामिळनाडू, भारत – 600029 असा आहे, यांना लागू आहे. या धोरणात Indus आणि त्याच्या संलग्न संस्था, उपकंपन्या व सहयोगी (एकत्रितपणे “Indus” / “आम्ही” / “आमचे” / “आम्हाला” – संदर्भानुसार) तुमची वैयक्तिक माहिती कशी गोळा करतात, जतन करतात, वापरतात आणि इतर प्रकारे प्रक्रिया करतात, याचे वर्णन केले आहे. हे https://www.indusappstore.com/ (“Indus वेबसाइट”), Indus Appstore – डेव्हलपर प्लॅटफॉर्म (“डेव्हलपर प्लॅटफॉर्म”), Indus Appstore मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि इतर संबंधित सेवा (एकत्रितपणे “प्लॅटफॉर्म” म्हणून संबोधले जाणारे) यांच्यामार्फत केले जाते. प्लॅटफॉर्मचा वापर करून, Indus वेबसाइटला भेट देऊन, आमच्या कंटेन्टशी इतर कोणत्याही संकेतस्थळांवर संवाद साधून, तुमची माहिती प्रदान करून किंवा आमची उत्पादने/सेवा वापरून, तुम्ही या गोपनीयता धोरणास (“धोरण”) आणि लागू असलेल्या सेवा/उत्पादनांच्या अटी व शर्तींना बांधील राहण्यास स्पष्टपणे सहमती देता. आम्ही तुमचा आमच्यावर असलेला विश्वास महत्त्वाचा मानतो आणि तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो, सुरक्षित व्यवहार आणि तुमच्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी सर्वोच्च मानके राखतो. हे गोपनीयता धोरण भारतातील कायदे व नियम, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 अंतर्गत जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती व प्रक्रिया आणि संवेदनशील वैयक्तिक माहिती) नियम, 2011 यांच्या तरतुदींनुसार प्रकाशित केलेले आहे व त्याच अनुषंगाने समजून घेतले जाईल, ज्यामध्ये वैयक्तिक माहितीच्या संकलन, वापर, साठवण, हस्तांतरण, प्रकटीकरण यासाठी गोपनीयता धोरण प्रकाशित करणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहिती म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संबंधित असलेली सर्व माहिती, ज्यामध्ये संवेदनशील वैयक्तिक माहितीचाही (त्याच्या संवेदनशील व वैयक्तिक स्वरूपामुळे उच्चस्तरीय डेटा संरक्षण आवश्यक असलेली सर्व वैयक्तिक माहिती) समावेश होतो. पुढे या सर्वांना “वैयक्तिक माहिती” म्हणून संबोधले जाईल, परंतु सार्वजनिक क्षेत्रात सहज उपलब्ध किंवा प्रवेशयोग्य असलेली कोणतीही माहिती यातून वगळली जाईल. जर तुम्ही या गोपनीयता धोरणाशी सहमत नसाल, तर कृपया आमचे प्लॅटफॉर्म वापरू नका किंवा ते ॲक्सेस करू नका.

माहिती संकलन

आमच्या सेवा किंवा प्लॅटफॉर्म वापरताना, किंवा आमच्याशी असलेल्या संबंधाच्या कालावधीत अन्य प्रकारे संवाद साधताना, आम्ही तुमची वैयक्तिक माहिती गोळा करू शकतो. तुम्ही विनंती केलेल्या सेवांसाठी आवश्यक आणि संबंधित अशीच वैयक्तिक माहिती आम्ही गोळा करतो, तसेच प्लॅटफॉर्मचा दर्जा सतत सुधारण्यासाठीही ती गोळा करण्यात येते.

संकलित करण्यात येणाऱ्या वैयक्तिक आणि संवेदनशील वैयक्तिक माहितीमध्ये खालील बाबींचा समावेश असू शकतो, मात्र एवढ्यावरच ती मर्यादित राहील असे नाही:

  • तुमचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस आणि आमच्याकडे खाते तयार करताना दिलेली इतर कोणतीही माहिती
  • जर तुमचे आधीच PhonePe ग्रुपमध्ये अकाउंट असेल, तर तुमच्या PhonePe प्रोफाइलमधून आम्ही तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतो, ज्यात नाव, ईमेल आयडी आणि प्रोफाइलमध्ये दिलेली इतर माहिती यांचा समावेश असू शकतो
  • तुमच्या क्रियाकलापाशी संबंधित माहिती, जसे की तुमचा जाहिरात आयडी, इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्सची यादी, अ‍ॅप वापराशी संबंधित माहिती, अ‍ॅपवरील पुनरावलोकने आणि रेटिंग्स, अ‍ॅपची भाषा, अ‍ॅप वापराची आकडेवारी, तसेच आमचे प्लॅटफॉर्म किंवा इंडसकडून अथवा Indus च्या वतीने इतर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिराती आणि इतर कंटेन्ट वापरताना गोळा होणारी काही प्रकारची माहिती
  • आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या क्रियाकलापांबद्दलची माहिती तृतीय पक्ष भागीदारांकडून मिळू शकते, ज्यामध्ये मूळ उपकरण उत्पादक (OEMs) यांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, आम्ही एखादी सेवा संयुक्तरित्या देत असताना किंवा आमच्या जाहिराती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना भागीदाराकडून मिळणारी माहिती.
  • तुमचा मोबाइल क्रमांक आणि उपकरणाशी संबंधित तपशील, जसे की डिव्हाइस आयडेंटिफायर, डिव्हाइस भाषा, डिव्हाइसविषयक माहिती, इंटरनेट बँडविड्थ, मोबाईल उपकरणाचा ब्रँड आणि मॉडेल, अ‍ॅप्सवर घालवलेला वेळ, इन्स्टॉल केलेली अ‍ॅप्स आणि संबंधित माहिती, IP ॲड्रेस आणि लोकेशन, मायक्रोफोन, कनेक्शनची माहिती इत्यादी.

जर तुम्ही डेव्हलपर असाल, तर डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर तुमची नोंदणी आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी आम्ही तुमचे नाव, ईमेल, संपूर्ण पत्ता, पॅन तपशील, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना यांचे तपशील अतिरिक्त स्वरूपात गोळा करू.

प्लॅटफॉर्मच्या वापराच्या विविध टप्प्यांवर माहिती गोळा केली जाऊ शकते, जसे की :

  • प्लॅटफॉर्मना भेट देणे
  • प्लॅटफॉर्मवर “वापरकर्ता” म्हणून किंवा प्लॅटफॉर्मवरील अटी व शर्तींनुसार असलेल्या इतर कोणत्याही संबंधानुसार नोंदणी करणे, तसेच डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर खात्याची पडताळणी करणे
  • प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणे किंवा व्यवहार करण्याचा प्रयत्न करणे
  • प्लॅटफॉर्मकडून किंवा प्लॅटफॉर्मच्या मालकीच्या लिंकवर, ईमेलवर, चॅट संभाषणे, अभिप्राय, सूचना, जाहिराती ॲक्सेस करणे आणि आमच्याकडून अधूनमधून घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांत सहभागी होणे
  • Indus च्या संलग्न संस्था, घटक, उपकंपन्या किंवा सहयोगी यांच्याशी व्यवहार करणे, ज्यामध्ये तुमचे PhonePe युजर अकाउंट तयार करणे याचाही समावेश आहे. तुमच्याशी संबंधित प्रोफाइल माहिती (जसे की नाव, ईमेल आयडी, तसेच तुम्ही दिलेली इतर प्रोफाइलमधील माहिती) ही PhonePe अ‍ॅपवर सर्वत्र समान असेल
  • Indus कडे करिअरच्या संधींसाठी अर्ज करताना किंवा Indus मध्ये नोकरीसाठी सामील होताना

माहितीचा उद्देश आणि वापर

Indus तर्फे खालील उद्देशांसाठी तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यात येऊ शकते :

  • तुमचे अकाउंट तयार करणे आणि तुमच्या ओळखीची व ॲक्सेससंदर्भातील अधिकारांचे व्हेरिफिकेशन करणे
  • आमच्याकडून, तसेच संलग्न संस्था, उपकंपन्या, सहयोगी किंवा व्यावसायिक भागीदारांकडून प्रदान करण्यात येणारी उत्पादने आणि सेवांमध्ये तुम्हाला ॲक्सेस देणे
  • अ‍ॅपस्टोअरवरील शोध सुविधा सक्षम करण्यासाठी ऑडिओ स्वरूपातील प्रश्न नोंदवणे
  • तुमचे प्रश्न, व्यवहार आणि/किंवा इतर कोणत्याही गरजांसाठी तुमच्याशी संवाद साधणे
  • तुम्हाला भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी संवादाशी संबंधित माहितीचे विश्लेषण करणे. उदाहरणार्थ, शेवटचा अपलोड/रूपांतरण/कार्यवाही कधी झाली, तुम्ही आमच्या सेवा शेवटच्या वेळी कधी वापरल्या, आणि तत्सम इतर क्रियाकलाप तपासणे
  • Indus Appstore किंवा Indus वरून तुम्ही डाउनलोड केलेल्या इतर कोणत्याही अ‍ॅपमध्ये असलेले बग (त्रुटी) दुरुस्त करणे, सुधारित फंक्शन्स, उपलब्ध नसलेले प्लग-इन्स आणि नवीन आवृत्त्या (अपडेट्स) याबद्दल तुम्हाला माहिती आणि उपाय प्रदान करणे
  • तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा नवीन अ‍ॅप्सची शिफारस करण्यासाठी, इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्ससारखी माहिती वापरणे
  • एकत्रित पातळीवर युजरच्या वर्तनाचे विश्लेषण करून, तुम्हाला संबंधित अ‍ॅप्स आणि व्हिडिओ सुचवणे तसेच विविध प्रक्रियांमध्ये/अर्ज सबमिट करताना/उत्पादन किंवा सेवा घेण्याच्या प्रक्रियेत तुमचा युजर अनुभव अधिक चांगला करणे
  • अ‍ॅपस्टोअरमध्ये तुम्हाला अ‍ॅप्स आणि नोटिफिकेशन्स सानुकूल स्वरूपात देणे, अ‍ॅप्सचे व्यवस्थापन व अनइन्स्टॉलेशन करण्यात मदत करणे, अ‍ॅनालिटिक्स सेवा प्रदान करणे आणि प्लॅटफॉर्म्सवरील तुमचा अनुभव अधिक चांगला करणे
  • तुमच्याबद्दल आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून, आवश्यकतेनुसार तुमचा वापरकर्ता प्रवास सुलभ आणि सक्षम करणे
  • उत्पादने/सेवा यांचे वेळोवेळी निरीक्षण व पुनरावलोकन करणे; सेवा सानुकूलित करून तुमचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोपा करणे, तसेच ऑडिट्स करणे
  • प्लॅटफॉर्मवर किंवा तृतीय पक्षाच्या लिंकवरून तुम्ही घेतलेली/विनंती केलेली उत्पादने व सेवांसाठी तृतीय पक्षांना तुमच्याशी संपर्क साधण्याची परवानगी देणे
  • सुरक्षा उल्लंघन व हल्ले ओळखणे; खाती व क्रियाकलापांची पडताळणी करणे; आमच्या सेवांची सुरक्षितता आणि संरक्षण वाढवणे, जसे की संशयास्पद क्रियाकलाप किंवा आमच्या अटी व धोरणांचे उल्लंघन तपासणे व रोखणे, तसेच बेकायदेशीर किंवा संशयित फसवणूक, मनी लाँडरिंग किंवा इतर गुन्हेगारी क्रियाकलापांवर कारवाई करणे. यासाठी Indus किंवा भारतातील तसेच भारताबाहेरील सरकारी संस्थांकडून केल्या जाणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य ऑडिट किंवा तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिक ऑडिट्स करणे
  • आमच्या अटी व शर्तींची अंमलबजावणी करणे, बाजार संशोधनासाठी तुमच्याशी संपर्क साधणे, तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑफर्स, उत्पादने, सेवा व अपडेट्स याबद्दल माहिती देणे; मार्केटिंग, जाहिरात सादर करणे आणि तुमच्यासाठी खास तयार केलेली उत्पादने व ऑफर्स देऊन तुमचा अनुभव सानुकूलित व सुधारित करणे
  • कुकीज आणि इतर तंत्रज्ञानांद्वारे संकलित केलेली माहिती वापरून तुमचा युजर अनुभव आणि आमच्या सेवांची एकूण गुणवत्ता सुधारणे
  • सर्वेक्षण आणि संशोधन करणे, विकसित होत असलेल्या वैशिष्ट्यांची चाचणी करणे, आमच्याकडे असलेली माहिती विश्लेषित करून उत्पादने व सेवा यांचे मूल्यमापन आणि सुधारणा करणे, नवीन उत्पादने व वैशिष्ट्ये विकसित करणे, तसेच ऑडिट आणि समस्यांचे निराकरण करणे
  • आमच्या जाहिरात आणि मापन प्रणालींमध्ये सुधारणा करणे, ज्यामुळे आम्ही तुम्हाला संबंधित जाहिराती दाखवू शकू आणि जाहिराती व सेवांची प्रभावकारिता आणि व्याप्ती मोजू शकू
  • आमच्या सेवांचा वापर कसा केला जातो, जाहिराती व सेवांचा परिणाम मोजणे, ग्राहक सेवा प्रदान करणे इत्यादीसाठी आमच्या व्यवसायाला सहाय्य करणाऱ्या विक्रेते, सेवा प्रदाते आणि इतर भागीदारांसोबत जाहिरात आयडीसारखी माहिती सामायिक करणे
  • तुमच्यासोबतच्या संवादादरम्यान दिला जाणारा सपोर्ट/सल्ला यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी व एजंट्सचे प्रशिक्षण देणे
  • वाद मिटवणे, समस्या सोडवणे, तांत्रिक मदत व बग्स दुरुस्त करणे, तसेच सुरक्षित सेवा प्रोत्साहित करण्यात मदत करणे
  • कायदेशीर बंधनांची पूर्तता करणे

आम्ही इतर वैध व्यावसायिक कारणांसाठीही तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करू शकतो, मात्र तुमच्या गोपनीयतेवर कमीतकमी परिणाम होईल यासाठी, आणि प्रक्रिया शक्य तितकी मर्यादित ठेवण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलतो.

कुकीज किंवा तत्सम तंत्रज्ञान

आमच्या प्लॅटफॉर्मवरील काही पृष्ठांवर आम्ही “कुकीज” किंवा तत्सम तंत्रज्ञानासारखी डेटा संकलन साधने वापरतो, ज्यामुळे आमच्या वेबपृष्ठांचा वापर कसा होतो हे विश्लेषित करणे, प्रचारात्मक उपक्रमांची प्रभावकारिता मोजणे, प्लॅटफॉर्मचा वापर समजून घेणे आणि विश्वास व सुरक्षितता वाढवणे शक्य होते. “कुकीज” म्हणजे लहान फाइल्स, ज्या तुमच्या डिव्हाइसच्या हार्ड-ड्राइव्ह/स्टोरेजमध्ये ठेवण्यात येतात आणि आमच्या सेवा प्रदान करण्यात मदत करतात. कुकीजमध्ये तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती नसते. आमच्या काही सुविधा फक्त “कुकी” किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरल्यावरच उपलब्ध होतात. तसेच, सत्रादरम्यान तुम्हाला वारंवार पासवर्ड टाकावा लागू नये यासाठीही आम्ही कुकीज वापरतो. कुकीज किंवा तत्सम तंत्रज्ञान तुमच्या आवडीसंबंधी लक्ष्यित माहिती देण्यास देखील मदत करतात. बहुतेक कुकीज या “सेशन कुकीज” असतात, म्हणजे सत्र संपल्यानंतर त्या तुमच्या डिव्हाइसच्या हार्ड-ड्राइव्ह/स्टोरेजमधून आपोआप हटवल्या जातात. तुमचा ब्राउझर/डिव्हाइस परवानगी देत असेल, तर तुम्ही आमच्या कुकीज किंवा तत्सम तंत्रज्ञान नाकारू किंवा हटवू शकता, मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला प्लॅटफॉर्मवरील काही सुविधा वापरता येणार नाहीत आणि सत्रादरम्यान वारंवार पासवर्ड टाकावा लागू शकतो. याशिवाय, प्लॅटफॉर्मवरील काही पृष्ठांवर तुम्हाला तृतीय पक्षांनी ठेवलेल्या “कुकीज” किंवा तत्सम तंत्रज्ञानाचा सामना करावा लागू शकतो, आणि अशा तृतीय पक्षांच्या कुकीजच्या वापरावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.

माहितीची देवाणघेवाण आणि प्रकटीकरण

लागू असलेल्या कायद्यांनुसार, आवश्यक ती काळजी घेऊन आणि या धोरणात नमूद केलेल्या उद्देशांनुसार, तुमची वैयक्तिक माहिती सामायिक केली जाते.

तुमच्या व्यवहाराच्या दरम्यान, आम्ही तुमची वैयक्तिक माहिती व्यावसायिक भागीदार, सेवा प्रदाते, संलग्न संस्था, सहयोगी, उपकंपन्या, नियामक संस्था, अंतर्गत पथके इत्यादी विविध प्रकारच्या प्राप्तकर्त्यांसोबत सामायिक करू शकतो.

लागू असलेल्या परिस्थितीत, “ज्यांना माहिती आवश्यक आहे” या तत्वावर, खालील उद्देशांसाठी वैयक्तिक माहिती सामायिक केली जाईल : 

  • लागू असल्यास, Phonepe च्या सेवांसाठी एकसंध लॉगिन तयार करणे
  • तुम्ही घेतलेल्या अ‍ॅप्स/सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि तुम्ही केलेल्या विनंतीनुसार तुमच्यात व सेवा प्रदाता/डेव्हलपर यांच्यातील सेवा सुलभ करण्यासाठी
  • संवाद, मार्केटिंग आणि जाहिरात, डेटा व माहिती साठवण, प्रसारण, सुरक्षा, विश्लेषण, फसवणूक शोध, जोखीम मूल्यांकन आणि संशोधन यांसंबंधी सेवांसाठी
  • तुमच्या डिव्हाइसवर आमच्या सेवांचे वैयक्तिकरण करणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी
  • Indus Appstore आणि त्यावरील इतर अ‍ॅप्सच्या सॉफ्टवेअर अपडेट  देण्यासाठी
  • आमच्या अटी किंवा गोपनीयता धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी; एखादी जाहिरात, पोस्ट किंवा इतर कंटेन्टमुळे तृतीय पक्षाच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा आल्यास त्यास उत्तर देण्यासाठी; किंवा आमच्या वापरकर्त्यांचे किंवा सर्वसामान्य जनतेचे हक्क, मालमत्ता किंवा वैयक्तिक सुरक्षितता संरक्षित करण्यासाठी
  • कायद्याने तसे करणे आवश्यक असल्यास, किंवा सपीना, न्यायालयीन आदेश किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेला प्रतिसाद देण्यासाठी प्रकटीकरण करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटल्यास
  • सरकारी उपक्रम आणि लाभांसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या विनंतीवर
  • तक्रार निवारण आणि वाद सोडवण्यासाठी
  • Indus च्या अंतर्गत तपास विभागासोबत किंवा तपासाच्या उद्देशाने Indus कडून नेमलेल्या, भारतातील किंवा भारताबाहेरील संस्थांसोबत
  • आमचा (किंवा आमची मालमत्ता) कोणत्याही व्यावसायिक संस्थेसोबत विलीनीकरण, अधिग्रहण, पुनर्रचना, एकत्रीकरण किंवा व्यवसाय पुनर्संघटनाची योजना असल्यास, त्या संस्थेसोबत

या धोरणात नमूद केलेल्या उद्देशांनुसार तृतीय पक्षांसोबत माहिती सामायिक केली जाते, मात्र तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यावर त्यांची धोरणे लागू होतात. लागू असल्यास आणि शक्य तितक्या प्रमाणात, Indus हे सुनिश्चित करते की या तृतीय पक्षांवर कठोर किंवा किमान तितक्याच कडक गोपनीयता संरक्षणाच्या जबाबदाऱ्या असतील. तथापि, या धोरणात नमूद केलेल्या उद्देशांनुसार किंवा लागू असलेल्या कायद्यांनुसार, Indus नियामक संस्था आणि शासकीय अधिकाऱ्यांसारख्या तृतीय पक्षांसोबत वैयक्तिक माहिती सामायिक करू शकते. या तृतीय पक्षांनी तुमची वैयक्तिक माहिती कशी वापरली किंवा त्यांच्या धोरणांबाबत, Indus कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व स्वीकारत नाही.

साठवण आणि जतन

लागू असल्यास, आम्ही वैयक्तिक माहिती भारतातच साठवतो आणि ती ज्या उद्देशासाठी गोळा केली आहे, त्या उद्देशासाठी आवश्यक तेवढ्याच कालावधीसाठी आणि लागू असलेल्या कायद्यांनुसार जतन करतो. तथापि, फसवणूक किंवा भविष्यातील गैरवापर टाळण्यासाठी, किंवा कायद्याने आवश्यक असल्यास — जसे की कोणतीही कायदेशीर/नियामक प्रक्रिया प्रलंबित असताना किंवा त्या संदर्भात कोणताही कायदेशीर आणि/किंवा नियामक निर्देश प्राप्त झाल्यास — किंवा इतर वैध कारणांसाठी, आम्ही तुमच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती जतन करू शकतो. वैयक्तिक माहितीच्या जतन कालावधीची मुदत संपल्यानंतर, ती लागू असलेल्या कायद्यांचे पालन करून हटवली जाईल.

वाजवी सुरक्षा पद्धती

Indus ने वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि संवेदनशील वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी तांत्रिक आणि भौतिक सुरक्षा उपाय लागू केले आहेत. आम्हाला समजते की आमचे सुरक्षा उपाय कितीही प्रभावी असले तरी, कोणतीही सुरक्षा प्रणाली पूर्णपणे भेद्य नसते. म्हणूनच, आमच्या वाजवी सुरक्षा पद्धतींचा एक भाग म्हणून, आम्ही कठोर अंतर्गत आणि बाह्य पुनरावलोकने करतो, ज्यामुळे नेटवर्क आणि सर्व्हर्समधील अनुक्रमे ट्रान्सफर होत असलेल्या व स्थिर स्थितीत असलेल्या डेटासाठी योग्य माहिती सुरक्षा एन्क्रिप्शन किंवा नियंत्रण उपाय लागू असल्याची खात्री करता येते. डेटाबेस फायरवॉलच्या मागे सुरक्षित केलेल्या सर्व्हर्सवर साठवला जातो; सर्व्हर्सवरील प्रवेश पासवर्ड-संरक्षित असतो आणि तो केवळ मर्यादित लोकांपुरताच असतो. तसेच, तुमच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डची गोपनीयता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी तुमची आहे. कृपया तुमच्या प्लॅटफॉर्म्सवरील लॉगिन, पासवर्ड आणि ओटीपीची माहिती कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित कोणताही प्रत्यक्ष किंवा संशयास्पद तडजोडीचा प्रकार झाल्यास, आम्हाला त्याची माहिती देणे ही तुमची जबाबदारी असेल.

तृतीय पक्ष उत्पादने, सेवा किंवा संकेतस्थळे

जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म्सवर सेवा प्रदात्यांची उत्पादने आणि सेवा वापरता, तेव्हा संबंधित सेवा प्रदाते तुमची वैयक्तिक माहिती गोळा करू शकतात आणि अशा वैयक्तिक माहितीवर त्यांच्या गोपनीयता धोरणानुसार प्रक्रिया केली जाईल. तुमची वैयक्तिक माहिती त्या सेवा प्रदात्यांकडून कशी हाताळली जाईल हे समजून घेण्यासाठी, कृपया त्यांच्या गोपनीयता धोरणाचा आणि सेवा अटींचा संदर्भ घ्या. आमच्या सेवांमध्ये, तुम्ही आमचे प्लॅटफॉर्म्स वापरत असताना, इतर संकेतस्थळे किंवा अ‍ॅप्लिकेशन्सचे दुवे असू शकतात. अशी संकेतस्थळे किंवा अ‍ॅप्लिकेशन्स त्यांच्या स्वतःच्या गोपनीयता धोरणांनुसार चालवली जातात, जी आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. तुम्ही एकदा आमच्या सर्व्हर्सच्या बाहेर गेल्यानंतर (हे तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या लोकेशन बारमधील URL पाहून किंवा ज्या मोबाइल साइटवर तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येते, त्यावरून ओळखू शकता), अशी संकेतस्थळे किंवा अ‍ॅप्लिकेशन्सवर तुम्ही दिलेली कोणतीही वैयक्तिक माहिती त्या अ‍ॅप्लिकेशन/संकेतस्थळाच्या ऑपरेटरच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन राहते. ते धोरण आमच्या धोरणापेक्षा वेगळे असू शकते, त्यामुळे अशा अ‍ॅप्लिकेशन्स किंवा संकेतस्थळांचा वापर करण्यापूर्वी, कृपया ती धोरणे वाचा किंवा डोमेन मालकाकडून त्यांना पाहण्याची विनंती करा. या तृतीय पक्षांनी तुमची वैयक्तिक माहिती कशी वापरली किंवा त्यांच्या धोरणांबाबत, आम्ही कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्वीकारत नाही. प्लॅटफॉर्म्सवर चॅट रूम्स, फोरम्स, मेसेज बोर्ड्स, अभिप्राय फॉर्म्स, वेब लॉग्स/“ब्लॉग्स”, न्यूज ग्रुप्स आणि/किंवा इतर सार्वजनिक संदेश मंच उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. कृपया लक्षात ठेवा की या भागांमध्ये उघड केलेली कोणतीही माहिती ही सार्वजनिक माहिती बनते आणि तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती उघड करण्यापासून टाळावे.

तुमची संमती

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या संमतीने प्रक्रिया करतो. प्लॅटफॉर्म्स किंवा सेवा वापरून आणि/किंवा तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करून, तुम्ही या गोपनीयता धोरणानुसार इंडसकडून तुमची वैयक्तिक माहिती प्रक्रिया करण्यास संमती देता. जर तुम्ही आम्हाला इतर व्यक्तींशी संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती दिली, तर ती देण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि ती माहिती या गोपनीयता धोरणानुसार वापरण्यास तुम्ही आम्हाला परवानगी देता, असे तुम्ही दर्शवता. तसेच, तुम्ही या धोरणात नमूद केलेल्या उद्देशांसाठी, तुमची कोणत्याही अधिकृत डीएनडी नोंदणीमध्ये नोंद असली तरी, आम्हाला फोन कॉल्स आणि ई-मेलसारख्या माध्यमांतून तुमच्याशी संवाद साधण्यास संमती आणि परवानगी देता.

बाहेर पडण्याचा पर्याय

खाते तयार केल्यानंतर, आम्ही सर्व युजरना आमच्या कोणत्याही सेवा किंवा अत्यावश्यक नसलेल्या (प्रमोशनल, मार्केटिंगसंबंधी) संवादांपासून बाहेर पडण्याचा पर्याय देतो. जर तुम्हाला तुमची संपर्क माहिती आमच्या सर्व यादी आणि न्यूजलेटरमधून काढून टाकायची असेल किंवा आमच्या कोणत्याही सेवा बंद करायच्या असतील, तर कृपया ई-मेलमधील ‘अनसबस्क्राइब’ बटणावर क्लिक करा किंवा प्लॅटफॉर्म्सवरील ‘सपोर्ट’ विभागातून आमच्याशी संपर्क साधा.

तुम्हाला आमच्या उत्पादने/सेवांबाबत फोन कॉल आल्यास, त्या कॉलदरम्यान आमच्या प्रतिनिधीला कळवून तुम्ही अशा कॉल्सपासून बाहेर पडू शकता.

वैयक्तिक माहिती प्रवेश/दुरुस्ती

तुम्ही आमच्याकडे विनंती करून, तुमच्याकडून सामायिक केलेली वैयक्तिक माहिती पाहू आणि तपासू शकता. अशा कोणत्याही विनंत्या करण्यासाठी, कृपया या धोरणातील ‘संपर्क करा’ विभागात दिलेल्या संपर्क माहितीद्वारे आम्हाला लिहा. जर तुम्हाला तुमचे खाते किंवा वैयक्तिक माहिती हटवायची असेल, तर प्लॅटफॉर्म्सवरील ‘सपोर्ट’ विभागातून आमच्याशी संपर्क साधा. मात्र, तुमची वैयक्तिक माहिती जतन करण्याचा कालावधी हा लागू असलेल्या कायद्यांच्या अधीन असेल. वरील विनंत्यांसाठी, तुमची ओळख निश्चित करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी Indus तुमच्याकडून काही विशिष्ट माहिती मागू शकते. हा एक सुरक्षा उपाय आहे, ज्यामुळे वैयक्तिक माहिती अशा व्यक्तीला उघड केली जाणार नाही ज्याला ती मिळवण्याचा अधिकार नाही, किंवा ती चुकीच्या पद्धतीने बदलली जाणार नाही किंवा हटवली जाणार नाही. तुम्ही वापरत असलेल्या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया त्या प्लॅटफॉर्म्सवर सहज उपलब्ध असलेल्या अटी व शर्ती वाचा. यासंबंधी कोणतीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्म्सवरील ‘सपोर्ट’ विभागातून आमच्याशी संपर्क साधू शकता.

मुलांची माहिती

आम्ही 18 वर्षांखालील मुलांकडून जाणीवपूर्वक वैयक्तिक माहिती मागवत नाही किंवा गोळा करत नाही, तसेच आमचे प्लॅटफॉर्म्स फक्त अशा व्यक्तींनाच उपलब्ध आहेत, ज्या भारतीय करार अधिनियम, 1872 अंतर्गत कायदेशीर बंधनकारक करार करू शकतात. जर तुमचे वय 18 वर्षांखालील असेल, तर तुम्ही तुमच्या पालक, कायदेशीर संरक्षक किंवा कोणत्याही जबाबदार प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीखालीच प्लॅटफॉर्म्स किंवा सेवा वापराव्यात.

धोरणातील बदल

आम्ही आमच्या एकतर्फी निर्णयानुसार, कोणतेही पूर्वलिखित नोटीस न देता, कधीही या गोपनीयता धोरणातील काही भाग बदलण्याचा, सुधारण्याचा, जोडण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवतो. तथापि, बदलांबाबत तुम्हाला सूचित करण्याचा आम्ही वाजवी प्रयत्न करू, परंतु अपडेट्स/बदल पाहण्यासाठी गोपनीयता धोरण वेळोवेळी तपासणे ही तुमची जबाबदारी आहे. आमच्या सेवा/प्लॅटफॉर्म्सचा, बदल प्रसिद्ध केल्यानंतरही तुम्ही वापर सुरू ठेवल्यास, त्याचा अर्थ तुम्ही त्या बदलांना मान्य आहात असा होईल. आम्ही कधीही असे बदल करणार नाही ज्यामुळे तुम्ही आधी दिलेल्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाचा स्तर कमी होईल.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेबाबत किंवा या गोपनीयता धोरणासंदर्भात काही प्रश्न, शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही प्लॅटफॉर्म्सवरील ‘सपोर्ट’ विभागातून आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही वाजवी कालावधीत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कटिबद्ध आहोत. निराकरणामध्ये उशीर झाल्यास, त्याची माहिती तुम्हाला आगाऊ दिली जाईल.